कोल्हापूर - जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा होती. ती सभा ऑनलाइन घेण्यात आली. मात्र या सभेत प्रवेश करण्याचा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिस बंदोबस्तामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.